Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इयत्ता १० वी परीक्षेची आवेदनपत्रे १८ नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार

Webdunia
गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (08:06 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार दि. १८ नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
 
सदर परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह गुरूवार दि.१८ नोव्हेंबर ते गुरूवार दि. ९ डिसेंबर २०२१ या कालावधीत भरावयाची आहेत.
 
तर माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे शुक्रवार दि. १० डिसेंबर ते सोमवार दि. २० डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज सोमवार दि. २० डिसेंबर ते मंगळवार दि. २८ डिसेंबर २०२१ या कालावधीत भरता येतील. तर, माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी गुरूवार दि. १८ नोव्हेंबर ते गुरूवार दि. ३० डिसेंबर २०२१ असा आहे.
 
माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट मंगळवार दि. ४ जानेवारी २०२१ रोजी जमा करावयाची आहे. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: रोख रक्कम घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला

रोख रक्कम घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला

Hockey : भारताने उपांत्य फेरीत जपानचा पराभव केला

विधानसभा निवडणुकीत झारखंड आणि महाराष्ट्रातून 1000 कोटी रुपये जप्त

मुंबईत 14 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी 4 जणांना अटक

पुढील लेख
Show comments