rashifal-2026

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, सतर्कतेचा इशारा

Webdunia
गुरूवार, 4 ऑक्टोबर 2018 (09:28 IST)
राज्यात मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरूवात झालीय. उत्तरेकडून दक्षिणेकडे परतीचा पाऊस जात असतो. त्यामुळं जळगाव, गोंदीया या राज्याच्या उत्तरेकडील भागातून पाऊस परतत असल्याचं हवामान विभागाने जाहीर केलंय. दरम्यान, समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यानं अरबी समुद्रात वादळी वाऱ्याची शक्यता असल्यानं कोकण किनारपट्टीवर मच्छिमारांना सतर्कतेचा  इशारा देण्यात आलाय. येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. 
 
राज्यात यंदा सरासरीच्या ८ टक्के पाऊस कमी बरसलाय. मान्सूनचा पाऊस सरासरी १००७ मिमी पडतो. परंतु यंदा तो ९२५ मिमी इतकाच लागला आहे. कोकण आणि मध्य महाराष्टृात सध्या काही ठिकाणी पाऊस पडत असून परतीचा पाऊसही पडण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस मराठवाड्यात कमीच पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून काही भागाला पावसाने झोडपून काढले. रत्नागिरीत साखरपा, लांजा, संगमेश्वर या ठिकाणी पाऊस पडला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

मुंबई उच्च न्यायालयाच्या फटकारानंतर, बीएमसीने एक मोठे पाऊल उचलले; अनेक बांधकाम स्थळांवरील काम थांबवले

LIVE: सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ५३ आणि पंचायत समितीसाठी ९२ अर्ज अपात्र ठरले

India vs New Zealand 2nd T20 : टी-२० मालिकेतील दुसरा सामना रायपूर स्टेडियमवर खेळला जात आहे

वैष्णो देवी यात्रा स्थगित

पैसे काढून घ्या, 4 दिवस बँक बंद राहणार

पुढील लेख
Show comments