भारतीय मुस्लिमांचा आणि मुघलांचा काहीही संबंध नाही असं वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दिन ओवेसी यांनी केलं आहे. ओवेसी यांनी हा प्रश्न फेसबुकवर विचारला आहे. भारतीय मुसलमान आणि मुघलांचा काहीही संबंध नाही, पण हे सांगा की मुघलांच्या बायका कोण होत्या असा प्रश्न त्यांनी या पोस्टमध्ये विचारला आहे.
याच पोस्टमध्ये ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली आहे. संघामध्ये स्वाभिमान आणि सहानुभूती हे गुण शिकवले जात नाहीत. मदरशांमध्ये ते शिकवले जातात असं ओवेसी यात म्हणतात. या देशाला भारतीय मुसलमानांनी समृद्ध केलंय पुढेही करत राहातील असं ते म्हणतात.