Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चला तयारीला लागा! आषाढी वारीच्या तारखांची अखेर घोषणा; पाऊले चालती पंढरीची वाट

vari
Webdunia
सोमवार, 9 मे 2022 (08:16 IST)
वारकरी संप्रदाय ज्या क्षणाची डोळ्यात तेल घालून वाट पाहत असतात त्या आषाढी वारीच्या तारखांची घोषणा झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आषाढी वारी नेहमीप्रमाणे साजरी होऊ शकलेली नाही. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात आषाढी वारी संपन्न होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्येही मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.
 
जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येत्या २० जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. देहू संस्थानने यासंदर्भात आज घोषणा केली आहे. ही घोषणा होताच वारकऱ्यांनी जल्लोष केला आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात एकूण ३२९ दिंड्या सहभागी होणार आहेत. ही पालखी दोन ठिकाणी मुक्कामी असणार आहे. त्यात पुणे आणि इंदापूर या दोन ठिकाणांचा समावेश आहे. देहू येथून पालखी निघेल पायी प्रवास करुन ती ९ जुलै रोजी पंढरपूरमध्ये पोहचणार आहे. १० जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात रंगणार आहे.
 
आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी २१ जूनला प्रस्थान करणार आहे. कोरोनाचे निर्बंध यंदा शिथील केल्याने दोन्ही पालख्या अतिशय उत्साहात संपन्न होणार आहेत. दोन्ही पालख्यांच्या प्रस्थानाच्या तारखा जाहीर झाल्याने वारकरी बांधव तयारीला लागले आहेत. गेल्या वर्षी अत्यंत मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत आणि शिवनेरी बसच्या माध्यमातून पालखी निघाल्या होत्या. यंदा मात्र, अनादी काळापासूनच्या परंपरेप्रमाणे वारी संपन्न होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

LIVE: शहरी नक्षलवादविरोधी विधेयकावरून वाद,सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विरोध

बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये लक्ष्य सेनचा ली शी फेंगकडून पराभव

अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी15 जणांना घेऊन जाणारी बोट उलटली, तिघांचा मृत्यू, 12 बेपत्ता

नागपूर, अमरावती पाणी संकटाबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बैठक घेणार

शहरी नक्षलवादविरोधी विधेयकावरून वाद,सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विरोध

पुढील लेख
Show comments