suvichar

दुष्काळी लातूरला पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी मागितली पाण्याची भिक

Webdunia
मंगळवार, 7 मे 2019 (09:54 IST)
लातूर येथे राज्यात प्रथम आणि पुन्हा एकदा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून पाणी वाचविणे काळाची गरज बनली आहे. दिवसेंदिवस लातूरचा पाणी साठा कमी होत चालला तरी नागरिक आजही पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी करताना दिसत आहे. पाणी वाचवा यासाठी जनजागृती करण्याच्या हेतुने आज वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने लातुरात दारोदारी जाऊन पाण्यासाठी भीक मागण्यात आली. पाण्यासाठी भविष्यात भीक मागण्याची वेळ येऊ नये यासाठी जनजागृती करून पाणी वाचविण्याचे आवाहन करण्यात आले.
 
लातूर जिल्ह्यात पर्जन्यमान अत्यल्प होत असल्याने सातत्याने दुष्काळ आणि पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी लातूर जिल्ह्यात अनेक गावांत घागरभर पाण्यासाठी नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. लातूर शहराला १० दिवसाआड पाणी येत आहे. पाण्याची इतकी भीषण परिस्थिती असताना देखील अनेकजण मोठ्या प्रमाणात पाणी वाया घालवत आहेत. दहा दिवसाला पाणी येऊनही गटारीत पाणी सोडले जात आहे. पाणी वाचविणे काळाची गरज असून याकडे लक्ष वेधण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने मोती नगर भागात पाण्यासाठी भीक मागण्यात आली. भविष्यात पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ येऊ नये यासाठी या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
 
या उपक्रमात वसुंधरा प्रतिष्ठानचे शहराध्यक्ष उमाकांत मुंडलीक, वृक्ष लागवड अभियान प्रमुख अमोलप्पा स्वामी, शहर उपाध्यक्ष रामदास घार, सदस्य प्रशांत स्वामी, यासीन मुलानी, त्र्यंबक पाटील यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. नागरिकांनी देखील पाणी वाचवू असा निर्धार केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी कोचिंग कॅम्पस वर बुलडोझर चालला

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी २०२७ च्या जनगणनेत जात जनगणनेचा समावेश करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला

हरिद्वार वनक्षेत्रात पाय कापलेले वाघ आणि वाघिणीचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली

India-Italy Partnership पंतप्रधान मोदी-मेलोनी यांची भेट आणि भारत-इटली विशेष सामरिक भागीदारी, झालेल्या करारांविषयी जाणून घ्या

पंतप्रधान मोदींकडून मेलोनीना स्पेशल गिफ्ट

पुढील लेख
Show comments