Publish Date: Thu, 29 Sep 2022 (21:31 IST)
Updated Date: Thu, 29 Sep 2022 (21:33 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात समर्थकांनी जोरदार स्वागत केलं. ठाण्यात दाखल होताच रश्मी ठाकरे यांनी आनंद आश्रम इथल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं. त्यानंतर रश्मी ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या टेंभी नाका इथल्या देवीच्या दर्शन घेतलं. मानाची देवी अशी ठाण्यातील टेंभी नाका जय अंबे देवीची ओळख आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांनी टेंभी नाका जय अंबे देवीची स्थापना केली होती.
रश्मी ठाकरे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली तसंच खणा-नारळाने ओटी भरण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Edited by : Ratnadeep Ranshoor