स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी कायद्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आम्ही दशकांपासून हमीभावाला कायद्याचं स्वरूप द्या अशी मागणी करत आहे. पण, मोदी सरकार काळे कायदे आणून शेतकऱ्यांना कॉर्पोरेट हाऊसेसच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप राजू शेट्टींनी केला आहे.
केंद्र सरकार जोपर्यंत 3 कायदे मागे घेणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवलं जाणार आहे, असा इशारा राजू शेट्टींनी दिला. राज्य सरकारनं केंद्राचे कायदे लागू करण्याला स्थगिती दिली आहे. ज्यावेळी महाराष्ट्रात केंद्र सरकारचे कायदे लागू केले जातील. त्यावेळी महाराष्ट्रात दिल्ली पेक्षाही मोठं आंदोलन केले जाईल असा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे.