Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपुरात ऑटोची बसला धडक, 2 लष्करी जवान ठार, 7 जखमी

Webdunia
सोमवार, 17 जून 2024 (09:27 IST)
नागपुरात भीषण अपघात घडला आहे. ऑटोची बसला धडक लागून लष्कराच्या 2 जवानांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले. हा अपघात कन्हान पुलावर झाला.ऑटो आणि बस यांच्यात समोरासमोर धडक झाली, त्यात ऑटो चक्काचूर झाला. 
 
सदर घटना नागपुरातील कन्हान पुलावर झाला असून ऑटो आणि ट्रॅव्हलर बस मध्ये समोरासमोर धडक झाली या मध्ये दोन जवान शहीद झाले असून 6 जवान आणि चालक जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
मिळालेल्या माहितीवर, कामठी येथील गार्ड रेजिमेंट सेंटरचे 15 जवान दोन ऑटो रिक्षातुन जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या बस ने एका ऑटोला  जोरदार धडक दिली. या मध्ये दोन जवान जागीच ठार झाले.

या ऑटो मध्ये चालकासह एकूण 9 जण होते.7 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले. 
अपघातानंतर स्थानिकांनी बसची तोडफोड केली आणि नागपूर- जबलपूर महामार्ग रोखून धरला. धडक कशा मुळे झाली पोलीस शोध घेत आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले. नवीन कामठी पोलीस पुढील तपास करत आहे.  
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राज्य सरकारचे बँकांना शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज देण्याचे आवाहन

NEET Re-Test Result : NTA ने NEET री-टेस्टचा निकाल जाहीर केला

विजय वडेट्टीवार यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

LPG सिलिंडर झाले स्वस्त, नवीन दर जाणून घ्या

मुंबई रेल्वेचे स्टेशन आणि वेळ बदलली, या एक्सप्रेसमध्ये मिळणार फर्स्ट AC ची सेवा

सर्व पहा

नवीन

लोणावळ्यात भुशी डॅम धबधब्यात एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले

स्नेह राणाने एकाच डावात काढल्या 8 विकेट्स, गल्ली क्रिकेट ते टीम इंडिया; वाचा स्नेहचा प्रवास

अयोध्येच्या विकासासाठी कोट्यवधींचा खर्च, तरीही पहिल्याच पावसात दाणादाण - ग्राऊंड रिपोर्ट

डोळ्यांच्या कोरडेपणाकडे करू नका दुर्लक्ष, कोरडेपणा कमी करण्यासाठी 'हे' नक्की वाचा

अ‍ॅमेझॉनच्या नव्या तंत्रज्ञानानं वादाला तोंड फोडलेलं 'एआय वॉशिंग' म्हणजे काय आहे?

पुढील लेख
Show comments