suvichar

धावत्या रेल्वेत बाळाचा जन्म

Webdunia
गुरूवार, 28 एप्रिल 2022 (17:47 IST)
भोकर तालुक्यातील बटाळा येथील नाजुकाबाई अनिल कवडेकर ही गर्भवती महिला पती,दोन मुलींना सोबत घेऊन रेल्वेने भोकर येथून किनवटकडे माहेरी जात होती. मात्र प्रवासादरम्यान, या महिलेला रेल्वेतच प्रसुती कळा येण्यास सुरुवात झाली. याचवेळी इस्लापुर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर प्रदीप शिंदे हे याच रेल्वेने प्रवास करत होते. तेव्हा त्यांनी महिलेच्या पतीला विश्वासात घेऊन इतर काही महिलांच्या मदतीने रेल्वेतच या महिलेची सुखरूपपणे प्रसूती केली.
 
प्रसुतीदरम्यान, या महिलेनं एका बाळाला जन्म दिला. मात्र प्रसुतीनंतर रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी तातडीने त्यांना हिमायतनगर इथल्या प्राथमिक रुग्णालयात दाखल केलं. सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आलं आहे. रेल्वेत प्रसुती झालेल्या नाजुकाबाई यांना मिळालेल्या डॉक्टरांची आणि सह प्रवाशांची मदत महत्वाची ठरली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

रेल्वेच्या नावाने येणाऱ्या बनावट कॉल्सपासून सावध रहा; एका चुकीमुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

LIVE: महाराष्ट्र बोर्ड परीक्षांमध्ये झालेल्या कॉपीबाबत फडणवीस सरकारने मोठी कारवाई केली

बालभारती पुस्तकांच्या बेकायदेशीर छपाईविरुद्ध महाराष्ट्र सरकार मोहीम सुरू करणार

अजित पवार विमान अपघाताच्या चौकशीबाबत चर्चा करण्यासाठी रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली

महाराष्ट्र बोर्ड परीक्षांमध्ये झालेल्या नक्कल विरोधात फडणवीस सरकारने मोठी कारवाई केली, १०७ केंद्रांची मान्यता रद्द केली

पुढील लेख
Show comments