Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीडमध्ये हिजाब समर्थनार्थ ‘पहले हिजाब, फिर किताब’ आशयाचे बॅनर्स

webdunia
, मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (21:07 IST)
कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. बीडमध्ये बॅनर्स लावून आणि मालेगावमध्ये मुस्लिम समाजातील महिलांनी आंदोलन करून कर्नाटक सरकारचा निषेध केला.
 
कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद बीडमध्ये उमटले दिसले असून हिजाब समर्थनार्थ चौकात बॅनर्स लावण्यात आले आहेत. ‘पहले हिजाब, फिर किताब’ अशा आशयाचे हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तर मालेगावात मुस्लिम समाजातील महिला रस्त्यावर उतरल्या. मालेगाव महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम महिला रस्त्यावर उतरून त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच काही काळ धरणे आंदोलन केले. यावेळी संतप्त महिलांनी घोषणाबाजी करून कर्नाटक सरकारचा निषेध केला. कर्नाटक सरकार संविधानातून दिलेल्या अधिकारावर गदा आणत असल्याचा आरोप महापौर ताहेरा शेख यांनी केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास सरकारला नेमकी काय अडचण आहे ? खोपकर यांचा सवाल