Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Beed : बायको व सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

Webdunia
शनिवार, 16 डिसेंबर 2023 (19:50 IST)
Beed : घर म्हटले की वाद होतातच पती -पत्नी मध्ये वाद होणे हे सामान्य आहे.वाद होतात आणि मिटतात देखील.पण बीड जिल्ह्यात बायकोसह सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नितीन विनायक शेळके असे या मयत जावयाचे नाव आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.   
 
सदर घटना जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यात लोणी गावातील नितीन विनायक शेळके यांचे लग्न माजलगाव तालुक्याच्या श्रीक्षेत्र बाभळगावच्या रुपाली रुस्तुम सुरवसे हिच्याशी 2020 साली झाला. 6 महिन्यानंतरच नवरा -बायकोत वाद सुरु झाले. त्यानां एक मुलगी झाली तिचे नाव नेहा ठेवले. नितीनला त्याची बायको रुपाली नेहमी वेगळे राहण्यासाठी बोलायची शेतीची वाटणी करण्यासाठी सतत बोलायची. त्यावरून दोघांमध्ये भांडण व्हायचे. या वरून नितीनच्या सासरचे मंडळी नितीनला सतत मानसिक त्रास द्यायचे.   

दरम्यान नितीनची बायको दुसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी आली होती. त्याच्या मोठ्या मुलीचा नेहाचा वाढदिवस असल्यामुळे तो सासरी आला होता. त्यावेळी त्या दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून भांडण झाले. यावरून सासरच्या मंडळीने देखील त्याला सुनावले. सततच्या सासरच्या मंडळी तसेच बायको कडून मिळणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने टोकाचे पाउल उचलले. त्याने विष प्राशन करून आपले आयुष्य संपविले. 

या प्रकरणी नितीनचा भाऊ प्रशांत शेळके यांच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळींच्या विरोधात बीडच्या दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या दुर्देवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दानवेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर भाजपचा आक्षेप, कामकाज 3 वेळा तहकूब

गरीब मुलींच्या सामूहिक विवाहाने झाली अंबानी कुटुंबातील विवाह सोहळ्याची सुरुवात

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरीत 60 लोक मृत्युमुखी, अनेक जखमी

लोकसभा अध्यक्ष सदस्यांचा माइक बंद करू शकतात का? माइकचं नियंत्रण कोणाकडे असतं?

नुसरत फतेह अली खान यांच्या मृत्यूनंतर 27 वर्षांनी रिलीज होणार 4 कव्वाली, कसा सापडला हा अल्बम?

सर्व पहा

नवीन

हाथरसच्या सिकंदरराव येथे सत्संगाच्या वेळी चेंगराचेंगरी, 50 हून अधिक लोकांचा मृत्यू,शेकडो जखमी

सेबीकडून नोटीस मिळाल्यानंतर हिंडेनबर्गने अदानी प्रकरणात कोटक बँकेचे नाव ओढले

भुशी डॅम अपघातानंतर पुणे जिल्हा प्रशासनाने पर्यटकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या

पुण्यात झिका व्हायरसचे 6 रुग्ण आढळले, 2 गरोदर महिलांचा समावेश; काय काळजी घ्याल?

IND vs ZIM: बीसीसीआयने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी तीन मोठे बदल केले

पुढील लेख
Show comments