Dharma Sangrah

खासदार सुनील तटकरेंवर मोठी जबाबदारी

Webdunia
मंगळवार, 13 जून 2023 (07:21 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केलेले विधान चर्चेत आहे. त्यात शरद पवारांनी १० जूनच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांची नियुक्ती केली. त्यासोबतच जितेंद्र आव्हाडांनाही राष्ट्रीय पातळीवर विविध राज्यांचे प्रभारीपद सोपवले. आता खासदार सुनील तटकरे यांनाही पवारांनी मोठी जबाबदारी दिली आहे.
 
खासदार सुनील तटकरे यांना पक्षाच्या राष्ट्रीय खजिनदारपदाची जबाबदारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली आहे. याबाबतचे पत्र काढून प्रसिद्धीस देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा २४ वा वर्धापन दिन राज्यासह देशभरात साजरा करण्यात आला. याचवेळी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खासदार प्रफुल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली. शिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांची राष्ट्रीय खजिनदार पदी नियुक्ती जाहीर केली आहे. तसे नियुक्तीपत्र खासदार सुनिल तटकरे यांना देण्यात आले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ऑनलाइन ऑर्डर करण्यापूर्वी कपडे ट्राय करुन पहा

भाडेकरू आणि मालकांनो, लक्ष द्या! भाडे नियमांमध्ये मोठे बदल; नोंदणी न किती दंड जाणून घ्या

LIVE: वसई-विरारमध्ये भाजपला लक्षणीय यश; अनेक ज्येष्ठ बहुजन विकास आघाडी नेते सामील

वसई-विरारमध्ये भाजपला लक्षणीय यश; अनेक ज्येष्ठ बहुजन विकास आघाडी नेते सामील

पुणे न्यायालयात सावरकर मानहानीचा वाद पेटला, सावरकर कुटुंबाने राहुल गांधींच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

पुढील लेख
Show comments