suvichar

भाजपकडून विधानपरिषदेसाठी प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह यांना उमेदवारी देण्यात आली

Webdunia
शुक्रवार, 8 मे 2020 (16:54 IST)
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे. पक्षातील नवे आणि काही पक्षाबाहेरून आलेल्यांना संधी दिली आहे. मात्र एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता अशा दिग्गज नेत्यांना डावललं आहे.
 
धनगर समाजाचे नेते आणि लोकसभेत वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीतून निवडणूक लढवणारे गोपीचंद पडळकर विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीतून अजित पवार यांच्याविरुद्ध निवडणूक लढले होते. तेथे त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे. पडळकर देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मानले जातात. 
 
रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. नागपूरचे प्रवीण दटके हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत. नागपूरचे माजी महापौर आणि विद्यमान शहराध्यक्ष अशी त्यांची ओळख आहे. संघाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या महाल भागातून अनेक टर्म नगरसेवक आहेत. विधानसभेला त्यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी निर्माण झाली होती. 
 
भाजपचे चौथे उमेदवार डॉ. अजित गोपछडे हे तसे नवखा चेहरा आहे. विद्यार्थी दशेपासून संघाशी निगडित असलेले बालरोगतज्ज्ञ डॉ. गोपछडे नांदेडचे आहेत. अंबाजोगाई इथं वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या गोपछडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

चंद्रपुरातील गोंडपिपरी येथे भीषण रस्ता अपघात, दुचाकी आणि ट्रकची धडक, 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

LIVE: मनसेच्या २० व्या स्थापना दिनी राज ठाकरे यांनी तरुणांसाठी "महा-सदस्यत्व मोहीम" जाहीर केली

शेतकऱ्यांसाठी मोठी सूट: 7.5 HP पंपांसाठी 20 हजार कोटी वीज बिल माफीची अर्थसंकल्पात तरतूद

एचपीव्ही लसीकरण मोहीम यशस्वी; 9.84 लाखांहून अधिक मुलींना गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षण मिळेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ

नवीन ऑटो-टॅक्सी परवान्यांना स्थगिती; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments