Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपच्या चित्रा वाघ यांची ‘महाविकास’ सरकारवर घणाघाती टीका, म्हणाल्या – ‘कोरोनाची नाही राज्यात महिला अत्याचाराची लाट’

भाजपच्या चित्रा वाघ यांची ‘महाविकास’ सरकारवर घणाघाती टीका, म्हणाल्या – ‘कोरोनाची नाही राज्यात महिला अत्याचाराची लाट’
, मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (08:02 IST)
लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या  विरोधात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली. या मुद्यावरुन भाजपच्या  अनेक नेत्यांनी सरकारवर टीका केली असताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही ठाकरे सरकारवरजोरदार निशाणा साधला आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येई की नाही माहित नाही, पण राज्यात महिला अत्याचाराची लाट येत असल्याचे म्हणत चित्रा वाघ  यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
 
विठू माऊली सोशल फाऊंडेशन आणि भारतीय जनता पार्टी मावळ आयोजित लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी चित्रा वाघ बोलत होत्या.राज्यात महिला आत्याचाराची लाट येत आहे चित्रा वाघ  म्हणाल्या, महाविकास आघाडीचं हे सरकार  लोकधार्जिणे नसून, त्यांच्या आमदार, खासदार आणि बगल बच्च्यांसाठी हे सरकार आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही, हे माहिती नाही, पण राज्यात महिला आत्याचाराची लाट येत आहे. अत्याचाऱ्यांना पोलीस आणि सरकारची भीती राहिलेली नाही. राज्यात कोणालाच धाक नाही. संजय राठोड  सारख्या बलात्काऱ्याला  आणि सरकारमधील भ्रष्टाचारी सहकाऱ्यांना वाचवण्याचं पाप हे सरकार करत आहे, असा घणाघात त्यांनी केला.
 
उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं, म्हणून संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवत आहात.मग ज्या मावळात  आपण बसलोय त्याच मावळमधील शेतकरी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्यावेळी तीन शेतकऱ्यांना गोळ्या घालून ठार केले.त्यावेळेस महाराष्ट्र बंद का नाही केला? असा सवाल करत आमच्या संवेदना त्या उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Realme 13 ऑक्टोबरला आणणार नवीन फोन, कूलिंगसाठी 'डायमंड'चा वापर