Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा ‘एकला चलो रे’ चा नारा !

Webdunia
बुधवार, 22 मार्च 2023 (08:35 IST)
येणाऱ्या नगरपालिका निवडणूकच्या पार्शवभूमीवर यावेळी भाजपने एकला चलो चा नारा दिलाय . झालेल्या सावंतवाडी शहर भाजपच्या कार्यकारणी बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे ज्या पद्धतीत सावंतवाडी शहरात भाजप च्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत तसेच केसरकर यांचे पदाधिकारी कार्यकर्तेही त्याच पद्धतीने वागत आहेत. त्यामुळे आम्ही एकला चलो नुसारच होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत तयारी सुरू केली आहे . सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणारे यानुसारच कामाला लागा अशा सूचना माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी आज झालेल्या बैठकीत केल्या. यावेळी प्रत्येक प्रभागनिहाय भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी पोहोचा आणि तेथे पक्ष बांधणीच्या दृष्टीने काम करा. सावंतवाडी शहरात आपण गेल्या दोन वर्षात भाजपच्या माध्यमातून चांगले काम केले आहे हे जनतेपर्यंत पोहोचवा सर्व माजी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात पुन्हा जोमाने कामाला लागावे असेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी शहरात भाजपच्या वतीने प्रत्येक बुथ निहाय प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत, येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्ता पासून प्रत्येक प्रभाग निहाय लोकसभा प्रवास योजना राबवण्यात येणार आहे. भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंधवळे यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी सहा वाजता हॉटेल पर्ल येथे बैठक झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, विनोद सावंत ,परीक्षित मांजरेकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, राजू बेग ,आनंद नेवगी ,दिपाली भालेकर ,दिलीप भालेकर ,एडवोकेट संजू शिरोडकर ,विराग मडकईकर, निशांत तोरस्कर, अनिल सावंत, सुकन्या टोपले, मिसबा शेख ,कुणाल सावंत, धीरेंद्र म्हापसेकर , अमित गवंडकर ,मंदार पिळणकर ,श्री पाटकर ,हेमंत बांदेकर ,बंटी जामदार ,पिंट्या सावंत, नागेश जगताप, केतन आजगावकर, आदी उपस्थित होते. यावेळी श्री परब म्हणाले आता नगरपालिका निवडणुका कधीही लागू शकतात त्यामुळे आपल्याला स्वतंत्र निवडणूक लढवायचे आहे पक्षश्रेष्ठीने आपल्याला सूचना केले आहेत. आपण सर्वांनी एक दिलाने काम करूया आणि पुन्हा एकदा भाजपची सत्ता पालिकेवर आणूया जनता आपल्या सोबत आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे . त्यामुळे शहरात विकास निधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आला आहे. विकासाची कामे जोरात सुरू आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

पुढील लेख
Show comments