Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बस मध्ये बॉम्ब होता पथकाने केला निकामी

bomb diffused in bus
Webdunia
रायगड येथील कर्जत  ते आपटे  बसमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली,  बुधवारी दि.२० रात्री या सदृश वस्तूची चाचपाणी केली असता हा  ३ ते ३.५ केजीचा बॉम्ब असल्याचे अलिबाग बॉम्ब पथकाकडून स्पष्ट केले गेले.  कर्जत येथून आपट्याला येणारी बस आपटे बस डेपोमध्ये थांबली असताना वाहकला  पिशवीत  टाईम बॉम्ब सारखे दिसून आले होते.  त्यांनी लगेच स्थानिक पोलिसांना माहिती कळविली. पोलिसांनी ताबडतोब बॉम्ब शोधक पथकाला बोलावले होते. 
 
बुधवारी ता.२० मध्ये रात्री  रात्री बारा वाजण्याच्या सुमारास रायगडचे पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह अलिबाग वरून बॉम्ब शोधक पथक सोबत घटनास्थळी दाखल झाले. मात्र ही गोष्ट वाऱ्या सारखी पसरली आणि सर्वांमध्ये भितीचे वातावरण पसरले, पोलिसांनी सर्वांना बस पासूनच दूर अंतरावर नेले. आलेल्या बॉम्ब शोधक पथकाने पाहणी केली असता ती वस्तू खरोखरच बॉम्ब  असल्याचे दिसून आले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू झाले. शेवटी मध्‍यरात्री साडेतीनच्या सुमारास यशस्वीरीत्या बॉम्ब निकामी केला गेला आहे. ठाणे येथे देखील अश्याच छोट्या  बॉम्ब सदृश्य वस्तूचा स्फोट झाला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या किनारी भागात सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट जारी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रियंका चतुर्वेदी संतापल्या, सरकारकडे या 3 मागण्या केल्या

जागतिक मलेरिया दिन 2025: मलेरिया दिन का साजरा केला जातो, त्याचा इतिहास आणि थीम जाणून घ्या

दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, दहशतवाद संपवण्याची चर्चा... सर्व राजकीय पक्ष एकत्र आले

LIVE: महाराष्ट्रात तीव्र उष्णतेमुळे शाळा-कॉलेजच्या वेळा बदलणार

पुढील लेख
Show comments