Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गिरीशमहाजन यांच्या संपर्क कार्यालयाजवळ बॉम्ब

Webdunia
मंगळवार, 18 जून 2019 (10:02 IST)
जळगावचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या संपर्क कार्यालयाजवळ बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने जळगावमध्ये खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. या फोनमुळे पोलीस दलात एकच धावपळ उडाली.बॉम्ब ठेवल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्ष आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यात देण्यात आली. अज्ञात व्यक्तीने फोन करून दिलेल्या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला आहे. या घटनेची बातमी जळगावमध्ये वाऱ्यासारखी परसली असून नागरिकांनी संपर्क कार्यालयाच्या परिसरात गर्दी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य़ ओळखून घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ज्या क्रमांकावरुन फोन आला होता. त्या क्रमकाची माहिती काढण्यात येत आहे. पोलिसांनी परिसराची तपासणी केली असता कोणतीही बॉम्ब सदृष्य वस्तू आढळून आलेली नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचे सांगण्यात आले. अफवा पसरवून पोलीस दलाला वेठीस धरणाऱ्या संबंधीत व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

2029 नंतरही मोदी पंतप्रधान राहतील आणि देशाचे नेतृत्व करत राहतील, फडणवीसांचे विधान

LIVE: वर्धा जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात

पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे ध्येय घेत माजी क्रिकेटपटू केदार जाधव भाजप मध्ये सामील

Mumbai Metro Line 2B मुंबई मेट्रो लाईन 2B म्हणजे काय, जाणून घ्या कोणत्या मार्गांवर चालवता येईल

सांगलीचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेत्याचा गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments