Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेल्वे तिकीट बुकींगसह साई दर्शनाचे तिकीट बुक करा

Book Sai Darshan Ticket
Webdunia
शुक्रवार, 25 जानेवारी 2019 (09:07 IST)
आता शिर्डीला जाणाऱ्या साई भक्तांना रेल्वे तिकीटाच्या बुकींगसह साई बाबांचे दर्शन घेण्यासाठीही तिकीट बुक करता येणार आहे. भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे दर वर्षी करोडोंच्या संख्येने जाणाऱ्या भक्तांना खास सुविधा मिळेल. रेल्वेच्या या नवीन योजने अंतर्गत साईंच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना दर्शनासाठी तिकीट बुक करण्यासाठी सुविधा काही निवडक स्थानकांवरच देण्यात येणार आहे. साई भक्तांसाठी रेल्वेकडून देण्यात येणारी ही सुविधा येत्या २६ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.
 
शिर्डी साई नगर, कोपरगाव, मनमाड, नाशिक आणि नागरसोल या स्थानकांचे ई-तिकीट बुक करतानाच भक्त साईंच्या दर्शनासाठी ऑनलाईन तिकीट बुक करू शकतात. या सुविधेमुळे भक्तांना मंदिर परिसरात दर्शनासाठी लांब रांगेत उभे राहण्याची गरज असणार नाही. दर्शनासाठी ऑनलाईन तिकीटाची वैधता ट्रेन स्थानकांत पोहचल्यानंतर पुढील ४८ तासांपर्यंत असणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

‘पालिका निवडणुकीनंतर ठाकरेंचा पक्ष दिसणार नाही’, संजय शिरसाट यांचा दावा

पुणे : मुलीने अवैध संबंध उघड केल्यावर आईने अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल केला

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या करणाऱ्या आरोपीने तुरुंगातच गळफास घेतला

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा 'यलो अलर्ट' जारी

LIVE: महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा 'यलो अलर्ट' जारी

पुढील लेख
Show comments