Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

पेपर तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार

Boycott of teachers on paper examination
, गुरूवार, 31 मार्च 2022 (17:01 IST)
दहावी, बारावीचा निकाल रखडण्याची शक्यता आहे. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पेपर तपासण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत राज्यातील हजारो शिक्षकांनी पेपर तपासण्यास बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे  उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना पडून आहेत. या आंदोलनाचा परिणाम दहावी, बारावीच्या निकालावर होण्याची शक्यता असल्याने भविष्यात शिक्षण मंडळ संकटात सापडण्याची शक्यता आहे. 
 
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने विविध मागण्यांसाठी सरकारला निवेदन दिले होते. मागण्या पूर्ण न झाल्यास विनाअनुदानीत शाळांमधील तब्बल 30 हजार शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
 
विनाअनुदानित कायमस्वरूपी शाळांच्या मागणीमुळे शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उत्तरपत्रिका तपासणार नसल्याचे अनेक शिक्षकांनी सांगितले आहे. याचा परिणाम बोर्डाच्या निकालावर होऊ शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अपघातात बहिण-भावाचा मृत्यू