लोकसभा निवडणुकीच्या तारख्या जाहीर झाल्या आहे. बारामती लोकसभाच्या निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात जुंपली आहे. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात सम्पूर्ण पवार कुटुंबीय उतरले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार कुटुंबीयांमध्ये देखील संघर्ष होत आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सख्ख्या भावाने श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, मी आजवर अजित पवारांसोबत होतो. मी नेहमी त्यांना साथ दिली. आमच्यावर शरद पवार साहेबांचे खूप उपकार आहे. जे काही पदे मिळाली ते शरद पवार साहेबांमुळेच मिळाली. त्यांचे वय देखील आता 83 आहे.
अशा वेळी शरद पवार साहेबांची साथ सोडणं मला अजिबात पटलं नाही. मी चांगल्या वाईट काळात अजित पवारांना साथ दिली. आम्ही चर्चा केली असता त्यांनी आमदार तू आहे खासदार साहेबांना राहू दे. असे अजित पवार म्हणाले. अजित पवारांनी शरद पवार साहेबांचा मान ठेवला नाही. त्यांची किंमत केली नाही. कारण त्यांना पुढचे काही काळ दुसऱ्यांकडून लाभ मिळणार आहे. असं म्हणत त्यांनी अजित पवारांन अपशब्द बोलत टीका केली आहे. ही सर्व भाजप आणि आरएसएसची चाल आहे, कारण त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार साहेबांना संपवायचा खूप खूप प्रयत्न केला. असं म्हणतात घरातला कोणीतरी फोडल्याशिवाय घर संपत नाही. हे इतिहासात आहे. मी कोणाकडे लाभार्थी म्हणून जाणार नाही. मी कोणालाही घाबरत नाही.साहेबांना कमजोर समजू नका. साहेब जर दहा वर्ष जुने असते तर त्यांनी काय केलं असत हे कळलं असतं. त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून राज्य सोपवले आणि तुम्ही काय केलं. अशी घणाघात टीका श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर केली.