Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 12 January 2025
webdunia

पण कठोर निर्बंध आणावे लागतील : वडेट्टीवार

पण कठोर निर्बंध आणावे लागतील : वडेट्टीवार
, शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (15:57 IST)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विजय वडेट्टीवार यांनी गंभीर इशारा दिला आहे. राज्यात सध्या लॉकडाऊन नको, पण कठोर निर्बंध आणावे लागतील, असं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे लोकल वेळापत्रक रिशेड्युल करावं लागेल असं देखील ते यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे सिनेमागृह बंद करावे लागतील. तसेच मंगल कार्यालयावर वॉच ठेवावा लागेल, असं देखील ते म्हणाले.
 
महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. केरळ व महाराष्ट्र या दोन राज्यातच देशातील 65 ते 70 टक्के  रुग्ण आहे. हे दोन्ही राज्य हॉटस्पॉट झाले आहेत. पण लॉकडॉऊन करावं लागेल असं सध्या मी म्हणार नाही. मात्र अजून निर्बंध लावावे लागतील हे नक्की असं विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं आहे.  
 
गर्दी कमी करावी लागेल. मार्केटमध्ये निर्बंध बंद आणावे लागतील. सिनेमाघर बंद करावी लागतील.मंगल कार्यालयांवर वॉच ठेवावा लागेल. या सर्वांवर निर्बंध लावावे लागतील. परीक्षांबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की,' तामिळनाडूने सर्व विद्यार्थ्यांना पास  करण्याचा निर्णय घेतला.महाराष्ट्रालाही याबाबत निर्णय घ्यावा लागेल. परीक्षा घ्यावे लागतील असं अनेक जण सांगतात. मात्र ऑनलाईन परीक्षांबाबत तपासणी करतोय, असे देखील ते म्हणाले. शक्य असल्यास  त्यावर विचार करू, असं देखील ते म्हणाले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विदर्भातले शिवसैनिक एकवटणार