rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विदर्भातले शिवसैनिक एकवटणार

Shiv Sainiks
, शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (15:55 IST)
वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी मुख्य़मंत्र्यांवर स्वपक्षातूनच दबाव वाढतो आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विदर्भातले शिवसैनिक एकवटणार आहेत. विदर्भातले शिवसेना लोकप्रतिनिधी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांमुळे पक्षाचं काम करणं कठीण जात असल्याची खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर मांडणार आहेत. मंत्रिमंडळ स्थापनेवेळीही काही खासदार, आमदार आणि जिल्हाप्रमुखांनी राठोड यांच्या मंत्रीपदाला विरोध केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुन्हा राठोड यांच्या विरोधात पत्र देण्याची शक्यता आहे. 
 
राठोड यांची राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी गच्छंती अटळ असल्याचं दिसून येतं आहे. मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावल्याची माहिती मिळाली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया हिवाळी खेळांचे उद्घाटन केले, जम्मू-काश्मीरला हिवाळी गेम्सचा बालेकिल्ला बनवतील