Dharma Sangrah

परंतु आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही : संजय राऊत

Webdunia
सोमवार, 23 मे 2022 (15:46 IST)
शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी नाकारली आहे. शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यावर आम्ही शिवसेनेचा उमेदवार जाहीर करु असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्याचे राऊत म्हणाले होते. संभाजीराजेंना विरोध नाही परंतु आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही असे स्पष्ट वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेना राज्यसभेच्या दोन्ही जागा लढवणार असल्याचे राऊतांनी सांगितले आहे. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निमंत्रणाकडे संभाजीराजेंनी पाठ फिरवली आहे. संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी राऊत म्हणाले की, शिवसेना दोन जागा लढवणार आहे. दोन जागा लढवणं हा राजकीय अपराध नाही. शिवसेना राजकीय पक्ष आहे. मराठी माणुस आणि हिंदुत्वाचे फार मोठी संघटना आहे. शिवसेना राजकारणात अनेक वर्ष आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. अशा वेळेला जेव्हा राज्यसभेच्या निवडणुका ६ जागांसाठी होत आहेत. त्यातील २ जागा शिवसेना लढत आहे. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आम्ही देऊ आणि निवडून आणू अशी शिवसनेची भूमिका असल्याचे राऊतांनी सांगितले आहे.
==============

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

जिल्हा परिषद निवडणुका; पुणे, कोल्हापूर आणि लातूरसह १२ जिल्ह्यांमध्ये उद्या मतदान, ९ तारखेला मतमोजणी

SIR वादात ममता बॅनर्जींच्या समर्थनार्थ शिवसेना (UBT) उतरली, दुबे म्हणाले, "अगदी वरिष्ठ वकीलही असे धाडस दाखवत नाहीत

गडचिरोलीमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ला उद्ध्वस्त

LIVE: गडचिरोलीमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

'पवारांना त्यांचे शिष्य सल्ला देत आहे,' राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या अटकळांवर संजय राऊत यांचा कडक उपहास

पुढील लेख
Show comments