Subhash Dandekar passed away :कॅमलिन फाईन सायन्सेसचे संस्थापक आणि स्टेशनरी उत्पादक कोकुयो कॅमलिनचे मानद अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. सुभाष दांडेकरांना लोक दादासाहेब दिगंबर दांडेकर म्हणायचे. दांडेकर हे सामाजिक भान, कला आणि उद्योजकतेतील योगदानासाठी ओळखले जात होते.
ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होती. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी शोकसभा घेण्यात येणार असल्याची माहिती कौटुंबिक सूत्रांनी दिली.
दांडेकर यांनी जपानच्या कोकुयोला लोकप्रिय आर्टवर्क ब्रँड विकल्यानंतर, दांडेकर कोकुयो कॅमलिनचे मानद अध्यक्ष म्हणून काम केले.
त्यांच्या निधनावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केले आहे. ते म्हणाले, मराठी उद्योगाला नावलौकिक मिळवून देणारे आजोबा राज्याने गमावले आहे. त्यांनी हजारो तरुणांना रोजगार देऊन त्यांच्या आयुष्यात रंग भरला.