Marathi Biodata Maker

चांदवडजवळ राहुड घाटात अपघात, २ ठार तर ६ जखमी

Webdunia
सोमवार, 26 डिसेंबर 2016 (17:07 IST)
नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ राहुड घाटात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात २ प्रवासी जागीत ठार झाले असून ६ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी चांदवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास MH ०४, EH-४५६७ या क्रमांकाची इनोव्हा चांदवडकडून मालेगावकडे भरधाव वेगाने जात होता. त्याच्या पुढे एक टाटा कंपनीची छोटा हत्ती वाहन MH-१८, AA ५१७२ जात होते. इनोव्हाच्या चालकाने मागून या वाहनाला चांदवडच्या पुढे असणाऱ्या राहूड घाटातील पवार वस्तीजवळ धडक दिली. या वाहनात बसलेले प्रवाशी शातीशरण राजाराम वर्मा (४७), बबिता सुकलाल पाथरे (४५) यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना चांदवडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी छोटा हत्ती वाहन चालक दिनेश भगवान करंकाळ यांनी इनोव्हा वाहन चालक सचिन शिवाजी मलिकवर दोघांच्या मृत्यू आणि इतर सहा जण जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

प्राणघातक 'मांझा' ने घेतला दोघांचा बळी; वडील आणि मुलगी ७० फूट उंच उड्डाणपुलावरून पडल्याने मृत्यू

LIVE: नांदेडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

इराणसोबतच्या तणावादरम्यान, अमेरिकेचा मोठा निर्णय; ७५ देशांचे सर्व व्हिसा निलंबित

जप्त केलेल्या रुपयांच्या व्याजाचा अर्धा भाग सशस्त्र सेना कल्याण निधीत देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला दिले आदेश

महायुती २९ पैकी इतक्या महानगरपालिकांवर नियंत्रण ठेवेल; उपमुख्यमत्री फडणवीसांचा दावा

पुढील लेख
Show comments