Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डीएसकेंवर सीबीआयकडून 2 गुन्हे दाखल; 590 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

D S Kulkarni
, शनिवार, 15 एप्रिल 2023 (11:32 IST)
बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरोधात सीबीआयने 2 गुन्हे दाखल केले आहेत. बँकांची 590 कोटींची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, डीएसके यांनी भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय आणि विजया बँक यांच्याकडून 650 कोटींचे कर्ज घेतले होते. त्यापैकी 433 कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी थकवले आहे. या प्रकरणात पहिला गुन्हा सीबीआयने दाखल केला आहे. त्यांच्या कंपनीतील संचालक मंडळावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
तर डीएसके ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च लि. या कंपनीत 156 कोटींचा अपहार झाल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मादामा तुसाँमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मेणाचा पुतळा