Dharma Sangrah

CBIची नाशकात पुन्हा मोठी कारवाई; लष्कराचा मेजर आणि इंजिनिअर लाच घेताना ताब्यात

Webdunia
शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (07:54 IST)
नाशिक  – केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने नाशकात पुन्हा मोठी कारवाई केली आहे. गेल्या कारवाईत सीबीआयने वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील कर्मचाऱ्यांला लाच घेताना ताब्यात घेतले होते. आता सीबीआच्या हाती मोठे मासे गळाला लागले आहेत. नाशिकमधील लष्कराच्या मेजरसह एका इंजिनिअरला सीबीआयच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
 
नाशिकमध्ये लष्कराच्या हवाई प्रशिक्षणाचे केंद्र (कॅट) कार्यरत आहे. याठिकाणी लष्कराच्या हेलिकॉप्टर्सचे प्रशिक्षण दिले जाते. हे भारतातील एकमेव मोठे केंद्र आहे. विशेष म्हणजे, याच केंद्राला प्रेसिडेंट कलर हा सर्वोच्च सन्मानही मिळाला आहे. आणि याच केंद्रात सीबीआयचे पथकाने मोठी कारवाई केली आहे. कॅटमध्ये कार्यरत असलेला मेजर हिमांशू मिश्रा आणि ज्युनिअर इंजिनिअर मिलिंद वाडिले हे दोन्ही एका कामासाठी कंत्राटदाराकडून लाच मागत असल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली. त्यानंतर सीबआयच्या पथकाने सापळा रचला. आणि या सापळ्यात हे दोघे सापडल्याचे सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक रणजित पांडे यांनी इंडिया दर्पणशी बोलताना दिली आहे.
 
सीबीआयच्या या कारवाईमुळे केवळ कॅटच नाही तर संपूर्ण लष्करामध्येच खळबळ उडाली आहे. लष्करात लाचखोरीची फारशी कारवाई होत नाही. त्यातच या कारवाईत मेजर दर्जाचा अधिकारीच सापडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच, ही लाच किती रुपयांची होती, कशासाठी घेतली जात होती यासह अन्य बाबी अद्याप उघड झालेल्या नाहीत. सीबीआयचे पथक अद्याप कॅटच्या आवारातच असून दोघांसह अन्य बाबींची कसून चौकशी सुरू आहे. लवकरच या प्रकरणातील अधिक बाबी उजेडात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली, 4 जानेवारी 2026 रोजी होणार

पुणे महानगर पालिकेने पिंपरी-चिंचवडमधील प्रदूषण रोखण्यासाठी ARAI ला दिली मान्यता

जर्मनीने भारतीय हॉकी संघाचा पराभव करत उपांत्य सामना 5-1 असा जिंकला

अनोखी परंपरा: नवरदेवाला आईचे दूध पाजण्याची विधी, ही कोणती पद्धत आहे ? व्हायरल व्हिडिओबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत

पुढील लेख
Show comments