आज देशात विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानुसार, आज दक्षिण भारतात मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे. हवामान खात्यानं पुढील 24 तासांत तामिळनाडू किनारपट्टी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच पश्चिम मध्यप्रदेश, पूर्व राजस्थान, तामिळनाडू, महाराष्ट्र, पुद्दुचेरी आणि कराईकल, किनाऱ्या भागात आणि दक्षिण अंतर्गत केरळ, माहे, कर्नाटक आणि लक्षद्वीप मध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यामुळे बुधवार पर्यंत संपूर्ण दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.तर उत्तरेकडे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मंगळवारी उत्तर भारत आणि लगतच्या भागात ढगाळी वातावरण राहील. या वातावरणाचा परिणाम उत्तर भारतात होणार त्यामुळे 9 जानेवारी रोजी लडाख, बाल्टिस्तान, जम्मू काश्मीर, गिलगिट, हिमाचलप्रदेश, मुज्जफराबाद, उत्तराखंडात जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.