वातावरणातील बदलामुळे राज्यात सध्या गुलाबी थंडीचा अनुभव मिळत आहे. पण आता हीच गुलाबी थंडी बोचरी होणार असून पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. आता पुढच्या दोन ते तीन दिवसात राज्यात काही भागात थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे.
पुणे वेधशाळेने महाराष्ट्रात शीतलहर येणार असल्याचा इशारा दिला आहे. सध्या मुंबईसह बहुतांश जिल्ह्यात तापमान 15अंशांचा खाली गेला आहे मात्र 5 ते 6 जानेवारी नंतर राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार असून काही भागात पावसाची शक्यता देखील आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यात काडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.