राज्यातील विविध भागांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याच्या मुंबई येथील केंद्राने वर्तवला आहे.
आज राज्यातील विविध भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना आजही हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज उत्तर महाराष्ट्रासह उत्तर कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली आहे.