Dharma Sangrah

राज्यस्तरीय एक दिवसीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

Webdunia
बुधवार, 14 डिसेंबर 2016 (17:07 IST)
मॉर्फी चेस अँकॅडमीतर्फे व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने येत्या रविवार दि. २२ जानेवारी रोजी नवरंग हॉल, पंचवटी, नाशिक येथे राज्यस्तरीय एक दिवसीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
या स्पर्धेला महाराष्ट्रातील खेळाडूंचा मोठय़ा प्रमाणात प्रतिसादलाभत आहे. विजेत्यांना १ लाखाची बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना २१ हजार, १५ हजार, १0 हजार, ५ हजार याप्रमाणे पहिल्या १५ खेळाडूंना मुख्य बक्षिसे, १६00 (यलो रेटिंग) आंतरराष्ट्रीय गुणांकनाखालील गटासाठी प्रथम ५ हजार, ३ हजार याप्रमाणे पहिली ५ बक्षिसे, १४00 (यलो रेटिंग) आंतरराष्ट्रीय गुणांकनाखालील गटासाठी प्रथम ३ हजार, २ हजार याप्रमाणे पहिली ५ बक्षिसे तसेच ९, ११, १३ वर्षांखालील खेळाडूंसाठी रोख बक्षिसे, ज्येष्ठ खेळाडूंसाठी व महिला खेळाडूंसाठी तसेच नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंना चालना मिळण्याच्या हेतूने ३ हजार, २ हजार याप्रमाणे ५ प्रोत्साहनपर रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. नाशिकच्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा म्हणजे एक पर्वणी असून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एक दिवसीय स्पर्धेतून बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी या स्पर्धेनिमित्त नाशिककरांना मिळत आहे व नाशिकच्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून विशेष बक्षिसेही नाशिकच्या खेळाडूंसाठी ठेवण्यात आली आहेत.  स्पर्धेबाबत आधिक महितीसाठी खेळाडूंनी ९६८९५८८७६५, ९७६२१0३२४0 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: Maharashtra Election Results भाजप+ १२१ जागांवर आघाडीवर

"ठाकरे बंधू घरी राहा, वर्क फ्रॉम होम करा" असा हल्ला BMC ट्रेंडवर शिवसेनेचा हल्ला

"हा देशद्रोह आहे...," राहुल गांधींनी बीएमसी निवडणुकीबद्दल असे का म्हटले?

बॉम्बची धमकी' मिळाल्यानंतर तुर्की एअरलाइन्सच्या विमानाचे बार्सिलोनामध्ये आपत्कालीन लँडिंग

"राजकारण सोडा आणि दुसरं काही करा..." बीएमसीचा ट्रेंड पाहून उद्धव ठाकरे गटातील एक नेता स्वतःच्या युतीवर संतापले

पुढील लेख
Show comments