Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Chhatrapati Sambhaji Nagar : कुटुंबावर गायींनी केला हल्ला, पती पत्नी आणि मुलगा जखमी

cows
, शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 (15:12 IST)
Chhatrapati Sambhaji Nagar:छत्रपती संभाजीनगरच्या बीबीचा मकबरा परिसरात मोदी हिल कॉलोनी मध्ये मोकाट फिरणाऱ्या गायींच्या कळपाने एका कुटुंबावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पती पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाली आहे. 
 
बीबीचा मकबरा परिसरातील मोदी हिल कॉलोनीत एक कुटुंब दुचाकींन रस्त्यावरून जात असताना समोरून येणाऱ्या गायींच्या कळपांन या कुटुंबावर अचानक हल्ला केला.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे हे कुटुंब वाहनांवरून खाली पडले आणि त्यानंतर देखील गायीनीं त्यांच्यावर हल्ला करून त्यांना पायदळी तुडवलं.

या घटनेत पती पत्नी आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाला असून त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाली असून या घटनेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या परिसरात गायीनीं उच्छाद मांडला असून गायीं मुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. प्रशासनाने गायींचा तातडीनं काही बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे.     
 

Edited by - Priya Dixit   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'आमदार अपात्रतेसंबंधी सुनावणीचं वेळापत्रक 17 ऑक्टोबरपर्यंत द्या, नाहीतर...'