Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती संभाजीनगर :भाजप-शिवसेना आज काढणार सावरकर यात्रा

Webdunia
रविवार, 2 एप्रिल 2023 (13:29 IST)
छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथे आज मोठी राजकीय लढाई होणार आहे. येथे एकीकडे भारतीय जनता पक्ष-शिवसेनातर्फे ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येणार असून, दुसरीकडे महाविकास आघाडीची (एमव्हीए) रॅली होणार आहे. या रॅलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक बडे नेते सहभागी होणार आहेत. काही दिवसांपूर्वी या शहरात जातीय दंगल उसळली होती. त्यामुळेच आता या दोन मोठ्या राजकीय घडामोडींवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
 
गेल्या काही काळापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील अनेक नेते स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधाने करत आहेत. राहुल जाणूनबुजून वीर सावरकर आणि मराठ्यांचा अपमान करत असल्याचा आरोप भाजप आणि शिवसेनेने केला आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधी यांना उत्तर देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने महाराष्ट्रभर वीर सावरकर गौरव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजीनगर येथील हिंदुत्ववादी सावरकर यांचे नाव असलेल्या चौकातून आजपासून सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे येथून एक किलोमीटर अंतरावर महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे.
 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments