Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती संभाजी महाराजांवरील 'आक्षेपार्ह' मजकुरावर मुख्यमंत्री फडणवीस यांची विकिपीडियावर कारवाई

छत्रपती संभाजी महाराजांवरील  आक्षेपार्ह  मजकुरावर मुख्यमंत्री फडणवीस यांची विकिपीडियावर कारवाई
Webdunia
बुधवार, 19 फेब्रुवारी 2025 (12:29 IST)
छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह माहिती देण्याविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकिपीडियाला आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे आदेश दिले आहे. विकिपीडियावर छत्रपती संभाजी महारांच्या बाबत आक्षेपार्ह मजकूर टाकण्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून आक्षेपार्ह मजकूर टाकण्याऱ्यांवर कारवाई करण्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. 
ALSO READ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली
या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र सायबर पोलिसांना विकिपीडियाशी संपर्क साधून छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दलची आक्षेपार्ह माहिती काढून देण्याचे आदेश दिले आहे. 
 
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांची कहाणी सांगतो. पण चित्रपटाच्या पार्श्वभूमीबाबत अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत.
ALSO READ: महाराष्ट्रात जीबीएसच्या प्रकरणांची संख्या 211 वर पोहोचली
दरम्यान, माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांनी महाराष्ट्र सायबर सेलच्या महानिरीक्षकांना विकिपीडिया अधिकाऱ्यांशी बोलण्यास आणि साइटवर असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध 'आक्षेपार्ह' मजकूर काढून टाकण्यास सांगितले आहे. यासोबतच, त्यांनी सांगितले की, ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास करणाऱ्या ओपन-सोर्स प्लॅटफॉर्मवर हे असे लेखन ते सहन करणार नाहीत. त्यांनी सांगितले की, आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Edited By - Priya Dixit
 
ALSO READ: किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी बोगस जन्मप्रमाणपत्राशी संबंधित काही कागदपत्रे अकोला पोलिसांना दिली

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

कॉमेडियन कुणाल कामरावर खार पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल

मुंबई: विलेपार्ले येथे क्रेननेखाली चिरडून महिलेचा मृत्यू

LIVE:26/11 हल्ल्यातील नायकाच्या सन्मानार्थ स्मारक बांधले जाणार

26/11 हल्ल्यातील नायकाच्या सन्मानार्थ स्मारक बांधले जाणार,महाराष्ट्र सरकारने जाहीर केले

मुंबई पोलिसांशी बोलण्याचा सल्ला देत कुणाल कामराकरिता विशेष सुरक्षेची मागणी संजय राऊतांनी केली

पुढील लेख
Show comments