Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपला घणाघाती टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपला घणाघाती टीका
Webdunia
रविवार, 10 एप्रिल 2022 (17:51 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात उत्तर मतदार संघातील पोटनिवडणुकी संदर्भात आयोजित केलेल्या ऑनलाईन सभेला व्हिडीओ कॉन्फरन्स च्या मध्यातून संबोधित केले. 
 
ते म्हणाले आम्ही कमी पडलो तरी चालेल पण खोटं बोलणार नाही. भाजपला सोडलं म्हणजे आम्ही हिंदुत्व सोडलं असं नाही. भाजप हे हिंदुत्व नव्हे. कोल्हापूर हा भगव्याच्या बालेकिल्ला आहे .मर्दाने मर्दा सारखे लढायला पाहिजे. लढायचे कसे हे कोल्हापूरकरांच्या कडून शिकावं. आम्ही शिवसैनिक आहोत. पाठीमागून वार करण्याची परंपरा आमची नाही. हिंदुहृदय सम्राटांनी निर्माण केलेली ही शिवसेना आता राहिली नाही. असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.त्यावर उत्तर देताना ते म्हणाले भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे. भाजपची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडले नव्हे. 
 
गेल्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसला लपून छपून मदत केली होती.त्यांनी सांगावं की त्यांनी मदत केली होती की नाही? भाजप दरवेळी धार्मिक मुद्द्याव पुढे आणते.कारण त्यांच्याकडे क्तुत्वाचे सांगण्यासारखे काहीच नाही. 
 
भाजप ओरडून सांगतात की शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं. तुम्ही म्हणजे काही हिंदुत्त्व नाही.
आम्ही कमी पडलो तरी चालेल पण खोटं बोलणार नाही. कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला असल्यानं जयश्री जाधव निवडून येणारच.असा विश्वास आहे.भाजपला हिंदू हृदय सम्राटवर प्रेम असेल तर त्यांनी नवी मुंबई विमान तळाला त्यांचं नाव देण्यास विरोध कशापाई केला. असं त्यांनी जोरदार टीका भाजपवर केली आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नीम करोली बाबा हनुमान चालिसा याबद्दल काय म्हणाले होते?

लग्नात नव्या नवरीच्या गळ्यात घातले जाणारे मंगळसूत्र उलटे का असतात जाणून घ्या

२७ फेब्रुवारीनंतर या ३ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकेल ! शुक्र आणि बुध यांच्या युतीने लक्ष्मी नारायण योग तयार होईल

साखर नियंत्रणासाठी ही प्रभावी आसने अवश्य करून पहा

प्रेशर कुकरमध्ये या सात गोष्टी कधीही शिजवू नये, चव आणि गुणवत्ता नष्ट होऊ शकते

सर्व पहा

नवीन

उद्धव ठाकरे स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास घाबरतात, महाकुंभाला उपस्थित न राहिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी केला हल्लाबोल

पत्नीच्या छळाला कंटाळून टीसीएस कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या

अलिबाग समुद्रकिनाऱ्याजवळ मासेमारी बोटीला भीषण आग

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी न्यायालयात दाखवता येईल, पण अनोळखी लोकांना नाही- दिल्ली विद्यापीठ

दक्षिण कोरियाची एचएस ह्युसंग कंपनी नागपुरात गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments