Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बालकांवर अत्याचार करणार्‍या या विकृताना पहा

बालकांवर अत्याचार करणार्‍या या विकृताना पहा
लहान बालकांना निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृतांना पकडण्यासाठी नवी मुंबई पोलिस काम सुरु केले आहे. यामध्ये पोलिसांनी  विकृतांची माहिती देणाऱ्यास 25 हजार रुपयांचं बक्षीस देणार आहे.बक्षिस नाही मात्र सामाजिक जाणीवेतून तर मदत आता अपेक्षित आहे.
 
यामध्ये दिसत असलेले विकृत हे  सोसायटीत रस्त्यांवर खेळणाऱ्या लहान मुला-मुलींना, त्यांच्या आई- वडिलांनी बोलावल्याचे सांगून, निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात हे उघड झाले आहे. यामध्ये हे अगदी सुरवातीला नवी मुंबई, नंतर  ठाण्याकडे  हे असे घाणेरडे काम करत आहेत. 
 
पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार हे नवी मुंबईतील खारघर, सीबीडी, सानपाडा, वाशी, एपीएमसी, कोपरखैराणे, रबाळे, दिंडोशी,कांदिवली आणि नुकतीच ठाण्यातील नवघर,डोंबिवली परिसरात लहान मुलींवर या विकृतांकडून लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.गेविकृतांचा शोध घेण्यासाठी आता नवी मुंबई पोलिसांनी विशेष पथक तयार केलं आहे.  विकृत सतत वेश बदलत असतात.त्या मुळे विकृतांची माहिती देणाऱ्यास नवी मुंबई पोलिसांकडून 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पोलिसांना मदत करणे गरजेचे असून नक्कीच मदत करायला हवी असे नागरिक म्हणत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाश्वतते करता पाण्याची साठवण आणि संवर्धन