Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सामान्य जनता , शेतकरी, कष्टकरी यांचे मोदी सरकारला काहीही देणेघेणे नाही-राहुल गांधी

modi rahul gandhi
, बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (08:35 IST)
वाशिमच्या चौक सभेला जमलेल्या हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप व मोदी सरकारवर तुफान टीका केली. ते म्हणाले की, देशाचा कणा असलेला लघु, मध्यम, छोटे व्यापार दुकानदार यांचे व्यवसाय बंद पडले, लाखो रोजगार गेले. दोन तीन उद्योगपतींसाठी मोदी सरकार काम करत आहे. सामान्य जनतेसाठी नाही. महागाई, बेरोजगारी संपवण्यासाठी मोदी सरकार काहीही करत नाही. गॅस ४०० रुपये, पेट्रोल ७० रुपये व डिझेल ६० रुपये असताना नरेंद्र मोदी युपीए सरकारवर कठोर टीका करत होते. आता गॅस १२०० रुपये, पेट्रोल १०९ रुपये व डिझेल ९६ रुपये झाले तरी नरेंद्र मोदी एक शब्दही उच्चारत नाहीत. सामान्य जनता , शेतकरी, कष्टकरी यांचे मोदी सरकारला काहीही देणेघेणे नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
 
मोदी सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही
युपीए सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले पण मोदी सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही. बड्या उद्योगपतींची लाखो कोटी रुपयांची कर्ज एनपीएच्या नावाखाली मात्र माफ केली जातात आणि शेतकऱ्यांना लाख दोन लाख कर्जासाठी त्रास दिला जातो. शेतमालाला एमएसपी मिळत नाही. तरुण शिक्षण घेऊन नोकरीचे स्वप्न पाहत आहे पण त्यांना नोकरी मिळत नाही. देशात हिंसा, द्वेष पसरवून समाजा-समाजात, जाती धर्मात भांडणे लावली जात आहेत. हा देश एकसंध रहावा, संविधान वाचावे, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडावी यासाठीच ही भारत जोडो यात्रा आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. सुहास परचुरे यांचे निधन