पुणे पोलिसांकडेआली 'विचित्र' तक्रार

पुणे पोलिसांकडे चक्क कोंबडा पहाटेच आरवतो असा तक्रार अर्ज एकाने दाखल केला आहे. हा विचित्र अर्ज वाचून पोलिसही चक्रावून गेले असून प्राणी हा विषय आमच्या अख्यारीत नसल्याचं सांगून त्यांनी महापालिकेच्या कोर्टात चेंडू टोलवला आहे. 
 
याघटनेत, एका महिलेने नाव न देता शहरातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला आहे. त्यात पहाटे साडेचारच्या दरम्यान कोंबडा आरवत असल्यामुळे झोप होत नसल्याचे म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम म्हणाले की, ' दोन दिवसांपूर्वी असा अर्ज दाखल झाला असून तो निनावी आहे. मात्र प्राणी हा विषय महापालिकेच्या अंतर्गत येतो, त्यामुळे आम्ही हा अर्ज निकालात काढला आहे'. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख मी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या