Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॉंग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप झाला? उद्धव सरकारने चौकशीसाठी समिती गठीत केली

Webdunia
शनिवार, 10 जुलै 2021 (13:22 IST)
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे.राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त (विशेष शाखा) या तीन सदस्यांच्या समितीचा भाग असतील. गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आठवड्यात राज्य विधानसभेच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात सभागृहात उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती.
 
कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी असा आरोप केला आहे की 2016-17 मध्ये ते संसदेचे सदस्य असताना आणि देवेंद्र फडणवीस राज्य सरकारचे नेतृत्व करीत असताना त्यांचा फोन टॅप झाला होता.ते म्हणाले की,अमली पदार्थांच्या तस्करी करणार्‍या अमजद खानचा नंबर असल्याच्या नावाखाली त्याचा फोन टॅप करण्यात आला होता.
 
सरकारने शुक्रवारी संध्याकाळी हे आदेश जारी करताना सांगितले की समिती या प्रकरणाची चौकशी करेल आणि तीन महिन्यांत आपला अहवाल विधान सभेत सादर करेल.आदेशात असे म्हटले आहे की जर फोनवर पाळत ठेवणे राजकीय हेतूने प्रेरित झाले तर या वर कारवाई केली जाईल.
 
जेव्हा नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला तेव्हा बर्‍याच सदस्यांनी उच्चस्तरीय चौकशीला पाठिंबा दर्शविला.पाटोळे हे विदर्भातील भंडारा प्रदेशातील सकोली विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी त्यांनी कॉंग्रेस सोडली होती आणि 2014च्या लोकसभा निवडणुका भाजपच्या तिकिटावर जिंकले होते.तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्यात मतभेद असल्याचे सांगून त्यांनी 2017 मध्ये भगवा पक्ष सोडला होता आणि कॉंग्रेसमध्ये परतले होते.
 

संबंधित माहिती

स्मृति इराणी यांनी गौरीगंजमध्ये केले मतदान, विकसित भारत संकल्प आणि महिला कल्याणासाठी टाकले मत

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

या दिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत होणार Monsoon ची एन्ट्री, जाणून घ्या मोठे अपडेट

लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात 13 सिटांसाठी मतदान

लज्जास्पद! 13 वर्षाच्या मुलाने मोठ्या बहिणीला केले प्रेग्नंट

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

मुंबईमधील फ्लॅटमध्ये वृद्ध दांपत्याची आत्महत्या, दुर्गंधी आल्यामुळे पोलिसांनी तोडले दार

मी सुटणार आहे, मला या तुरुंगात राहू द्या- अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला एनकाऊंटर होण्याची भीती

Bank Holidays: या आठवड्यात फक्त 3 दिवस उघडल्या राहतील बँका, बँकेला चार दिवस सुट्टी! यादी पहा

पुढील लेख
Show comments