Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार अडीच वर्षे सुरळीत असल्याने सरकार पाडण्याचे षडयंत्र : शरद पवार

Webdunia
मंगळवार, 21 जून 2022 (14:55 IST)
शिवसेनेचे आमदार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याआधीही महाराष्ट्राचे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटले. शिवाय, त्यांनी सरकार अडीच वर्षे सुरळीत असल्याने सरकार पाडण्याचे षडयंत्र असल्याचेही म्हटले.
 
दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी विरोधीपक्ष भाजपावर निशाणा साधला. “महाराष्ट्रात सत्तांतराचा हा तिसरा प्रयत्न आहे. भाजपाने यापूर्वी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मविआ सरकार बनवण्यापूर्वी ही अशी बंडाळी झाली होती. आम्ही विधान परिषदेच्या कालच्या निकालानंतर नाराज नाही. अडीच वर्षे सरकार योग्य चालत असल्याने हे षडयंत्र आहे. राजकीय पेचातून मार्ग निघेल सरकार कोसळणार नाही असा मला विश्वास आहे. तसेच, एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे की नाही माहित नाही”, असे त्यांनी म्हटले

संबंधित माहिती

गुगल आता फुकट नाही, सर्च करण्यासाठी पैसे द्यावे लागतील

भीमा कोरेगाव प्रकरणी शोमा सेन यांना जामीन मंजूर, या अटी घातल्या

12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला तीन वर्षानंतर अटक

निपुत्रिक महिलांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देणारे बाबा परमानंद यांचे निधन

लोकसभा निवडणूक 2024:शिंदेंच्या शिवसेनेने महाराष्ट्रातील दोन खासदारांची तिकिटे रद्द केली

SRH Vs CSK: आज सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार

अलिबागचे नाव बदलण्याची मागणी, हे नाव देण्याचा सल्ला विधानसभा अध्यक्षांनी दिला

महाराष्ट्रातील सर्व 48 जागा महाविकास आघाडीच्या- संजय राऊत

आमदारपत्नींना महायुतीकडून उमेदवारी

कोरोना पेक्षा 100 पट जास्त घातक महामारी

पुढील लेख
Show comments