Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंढरपुरात कोरोनाच्या स्फोट, एका भाविकाचा मृत्यू

pandharpur
, रविवार, 3 जुलै 2022 (16:03 IST)
यंदा पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जमले आहे. यंदा कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळानंतर भाविकांना विठ्ठलाचे 24 तास दर्शन करता येणार आहे. अद्याप कोरोनाचे संकट टळले नाही. आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी दूरवरून वारकरी आणि भाविक पंढरपुरात येत आहे. देशातून कोरोनासाठी लावण्यात आलेले निर्बंध काढण्यात आले आहे. पण अद्याप कोरोनाचा धोका कमी झालेला नसून पंढरपूरातून चिंताजनक बातमी येत आहे. पंढरपुरात कोरोनाचा स्फोट झाला असून पंढरपुरात तब्बल 39 भाविक कोरोनाबाधित आढळले आहेत तर कोरोनामुळे एकाचा मृत्यू  झाला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या ठिकाणी कोरोनाच्या संकटाला पाहता एक हजार रुग्णांची क्षमता असलेले विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या साठी मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीए कडून धमकीचा फोन ?गुलाबराव वाघ यांचा आरोप