Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना महाराष्ट्र : महाराष्ट्रात नवे निर्बंध, ब्युटी पार्लर आणि जिम 50 टक्के क्षमतेनं सुरू राहणार

webdunia
, रविवार, 9 जानेवारी 2022 (16:37 IST)
महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारनं नवीन निर्बंध जारी केले आहेत. असं असलं तरी नवीन निर्बंध हे कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान लागू केलेल्या निर्बंधांसारखे कठोर नाहीयेत.
आज (9 जानेवारी) रात्री 12 वाजेपासून हे निर्बंध लागू होणार आहेत.
 
याआधी राज्य सरकारनं ब्युटी पार्लर आणि जिम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण, आज (9 जानेवारी) सुधारित आदेश जारी करत ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमतेनं सुरू ठेवता येणार असं म्हटलं आहे.
 
पण, ही सेवा घेतेवेळी मास्क काढण्याची परवानगी नसेल. तसंच लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच ही सेवा पुरवली जाईल. सलूनमधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं असावं, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.
 
जिमही 50 टक्के क्षमतेनं सुरू राहणार आहेत. कोणताही व्यायाम करताना मास्क काढता येणार नाही. संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच जीम करण्याची परवानगी. जीममधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं असावं, असंही सुधारित आदेशात म्हटलं आहे.
नव्या नियमांनुसार, पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत महाराष्ट्रात जमावबंदी असेल. याकाळात 5 जणांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.
 
रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी असेल. या काळात अत्यावश्यक कारणांशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही
 
याशिवाय, दहावी-बारावीच्या परीक्षा वगळता महाराष्ट्रातल्या शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत.
याव्यतिरिक्तही अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत.
 
दहावी-बारावीच्या परीक्षा वगळता महाराष्ट्रातल्या शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार.
स्विमिंग पूल, स्पा, वेलनेस सेंटर बंद.
हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री 10 ते सकाळी 7 काळात हेअर कटिंग सलून बंद राहतील.
क्रीडा स्पर्धात्मक कार्यक्रम होणार नाहीत. राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय इव्हेंट्स या प्रेक्षकांशिवाय होतील आणि स्पर्धकांना आणि अधिकाऱ्यांना बायो बबलमध्ये रहावं लागेल.
एन्टरटेन्मेंट पार्क, प्राणी संग्रहालय, म्युझियम, किल्ले आणि तिकीट लागणाऱ्या इतर सार्वजनिक जागा बंद.
शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्समध्ये मर्यादित प्रवेश. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश.
रेस्टॉरंट्स आणि उपहारगृह 50 टक्के क्षमतेने सुरू. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश.
नाट्यगृह आणि सिनेमागृहातही 50 टक्के उपस्थिती. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश.
अन्नपदार्थांची होम डिलीव्हरी सुरू राहणार.
विमान, रेल्वे वा रस्तेमार्गे राज्यात दाखल होणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांना राज्यात दाखल होताना 72 तासांमधला RTPCR रिपोर्ट दाखवणं बंधनकारक.
UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या सूचनांनुसार होणार.
सरकारी कार्यालयांमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी. वर्क फ्रॉम होमचा पर्याय किंवा वेगवेगळ्या कामाच्या वेळांचा पर्याय वापरावा. कार्यालय प्रमुखाने हे निर्णय घ्यावे.
खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचारी क्षमतेने काम.
लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच ऑफिसमध्ये जायची परवानगी. लसीकरण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावं.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात न्यूड फोटोग्राफी प्रदर्शन वरून नवा वाद,