Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महंत कबिरदास महाराज यांच्यासह कुटुंबातील पाच जणांना कोरोना

महंत कबिरदास महाराज यांच्यासह कुटुंबातील पाच जणांना कोरोना
, गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (15:41 IST)
पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह कुटुंबातील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनात हजारो नागरिक उपस्थित होते. त्याच वेळी कोरोना संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गावातील एकूण पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 
 
पोहरादेवी मंदिराच्या महंताच्या कुटुंबातील पाच जण, आणखी तिघे जण, असे एकूण 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आरोग्य विभागाने 22 फेब्रुवारीला केलेल्या तपासणीच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
 
वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवार 22 फेब्रुवारीला वाशिममधील पोहरादेवीचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल