Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील विक्रोळी येथे इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रकवरून क्रेन कोसळली, दुचाकीस्वार गंभीर जखमी

मुंबईतील विक्रोळी येथे इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रकवरून क्रेन कोसळली  दुचाकीस्वार गंभीर जखमी
Webdunia
शनिवार, 14 डिसेंबर 2024 (15:06 IST)
मुंबईतील विक्रोळीजवळ ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पाइलिंग क्रेन घसरून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पायलिंग क्रेन अंगावर पडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. 
अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांचे पथक घटनास्थळी हजर झाले असून क्रेन ट्रक वर चढवण्यात आली.
 
सदर अपघात विक्रोळी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी ट्रेलर ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 
या अपघातात एका दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. विपुल पांचाळ(44) असे या जखमीचे नाव आहे. विपुल हे दुचाकीवरून कांदिवली कडे जात असताना जवळच असलेल्या एका ट्रेलर ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळे वाहनावर ठेवलेले अवजड यंत्र पांचाळ यांच्यावर पडले आणि ते गंभीर जखमी झाले. स्थानिक लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अपघातामुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली   

पोलिसांनी ट्रेलर ट्रक चालकाला भारतीय दंड संहिता कायद्यांतर्गत निष्काळजीपणे वाहन चालवल्या बद्दल आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमानुसार अटक करण्यात आली आहे. 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

म्यानमारमध्ये भूकंपात मृतांची संख्या 1002 वर पोहोचली, 2376 जखमी, भारता कडून ऑपरेशन ब्रह्मा सुरु

ईदच्या वेळी स्फोट आणि दंगलीच्या संदेशामुळे खळबळ, मुंबईत सुरक्षा व्यवस्था कडक

पंतप्रधान मोदी 30 मार्च रोजी नागपूरला भेट देणार,5000 हून अधिक पोलिस तैनात

LIVE: पंतप्रधान मोदी 30 मार्च रोजी नागपूरला भेट देणार

पुढील लेख
Show comments