Festival Posters

एकतर्फी प्रेमातून वाकडमध्ये विद्यार्थीनीची बोटे कापली

Webdunia
सोमवार, 3 एप्रिल 2017 (10:56 IST)
वाकड येथील बालाजी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून एका विद्यार्थीनीवर सोमवारी (दि. ३) सकाळी नऊच्या सुमारास सत्तूरने प्राणघातक हल्ला केला. वाकडच्या बालाजी सोसायटीत हा प्रकार घडला. या हल्ल्यात मुलीच्या हाताची बोटे कापली गेली आहेत. हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
राजेश बक्षी (वय २३, रा. मूळ हरियाणा) असे हल्लेखोर विद्यार्थ्याचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश आणि हल्ला झाललेली विद्यार्थीनी बालाजी महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत आहेत. राजेशने एकतर्फी प्रेमातून सोमवारी सकाळी संबंधित विद्यार्थीनीवर सत्तूरने हल्ला केला. त्यात तिची बोटे कापली गेली असून, ती गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने विद्यार्थीनीची बोटे शरीरापासून वेगळी झालेली नाहीत. हल्ला करणाऱ्या राजेशला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच जखमी मुलीला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वाकड पोलिस तपास करत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र १०वीचा निकाल जाहीर; एकूण ९२.०९% विद्यार्थी उत्तीर्ण झाले

LIVE: महाराष्ट्र दहावीचा निकाल जाहीर, मुलींची उत्कृष्ट कामगिरी

प. बंगालमधील विधानसभा बरखास्त, राज्यपालांचा मोठा निर्णय

२०२९ मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात या मागणीने जोर धरला; जय पवार यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात चर्चांना उधाण

मोबाईल पासवर्डच्या वादावरून गदारोळ, कॅबिनेट मंत्र्यांचे ओएसडी विजय कारंडे यांच्या विरोधात पुण्यात एफआयआर दाखल

पुढील लेख
Show comments