Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'वायू' वादळ: मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये

'वायू' वादळ: मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये
वायू चक्रीवादळ जलदगतीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत असून गुजरात राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी हवेच्या दाबामुळे वायू चक्रीवादळाचा धोका पश्चिम किनाऱ्यावरील शहरांना बसणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 13 जून रोजी पोरबंदर आणि कच्छ येथे वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. येथून 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
 
तसेच महाराष्ट्रात याचं संकट टळलं असलं तरी मुंबईत परिणाम जावणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये आणि झाडांखाली उभं राहू नये असा सल्ला देण्यात येत आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असून अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. 
 
वायू चक्रीवादळ मुंबईच्या दक्षिण किनारपट्टीपासून 280 किमी अंतरावर धडकलं आहे. हे वादळ 110-135 किमी प्रतिवेगाने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. तरी या वादळामुळे महाराष्ट्रातील उत्तर समुद्रकिनारी सोसाट्याचा वारा वाहणार असून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. 
 
समुद्रकिनारी जाणे टाळावे तसेच मच्छिमारांनीही समुद्रात प्रवेश करु नये अशा इशारा देण्यात आला आहे. या प्रभावामुळेच शहारत अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडण्याची शकतात असल्यामुळे मुंबईकरांनी झाडांपासून लांब राहावे असा सल्ला दिला गेला.
 
वायू चक्रीवादळ 110-135 किमी प्रतिवेगाने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. वायू चक्रीवादळाचा प्रभाव गुजरातमधील कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, राजकोट, जूनागड, सह अनेक जागी दिसून येण्याची शक्यता आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'हो, मी ऑटोसेक्शुअल आहे आणि मी स्वतःलाच डेट करते'