Dharma Sangrah

डीएसके दाम्पत्याच्या शोधाकरिता पुणे पोलिसांची चार पथके कार्यरत

Webdunia
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (12:22 IST)
प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटक करण्यास पोलिसांना मुभा दिली आहे. त्यामुळे डीएसके दाम्पत्याच्या शोधाकरिता पुणे पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयु्रत निलेश मोरे यांच्या देखरेखीखाली चार पथके कार्यरत केली आहेत, अशी माहिती पोलीस उपआयु्क्त पंकज डहाणे यांनी दिली.
 
पैसे परत करण्याच्या नावाखाली वेळकाढूपणा करणार्‍या डीएसकेंना अटकेपासून दिलेले संरक्षण न्यायालयाने काढून घेतले. तसेच, त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना दिले.
 
गुंतवणूकदारांकडून डीएसके यांनी मुदतठेवीच्या स्वरुपात कोट्यवधी रुपये जमा केले. त्याचा परतावा गुंतवणुकरांना वेळेत केला नाही. त्यामुळे आतापर्यंत चार हजार 99 गुंतवणुकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. त्यांच्या फसवणुकीची रक्कम 258 कोटी 21 लाख 16 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर ठेवीदारांकडून कर्जाच्या स्वरुपातही डीएसके यांनी रक्कम  गोळा केली असून त्याबाबत 39 कोटी 41 लाख 93 हजार रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झालेल्या आहेत. डीएसके यांच्या मालमत्ता विक्रीतून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचा निर्णय शासन पुढील काळात घेऊ शकते.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

इंस्टाग्रामवर मैत्री आणि नंतर लग्नाच्या आश्वासनावर विश्वासघात, अकोलामध्ये महिलेवर बलात्कार करणाऱ्या तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल

१ जानेवारी २०२६ पासून रेल्वे वेळापत्रकात बदल, प्रवाशांना दररोज १५७ मिनिटे वाचतील

LIVE: Pune शिवसेनेने १०० हून अधिक उमेदवार उभे केले, भाजपसाठी अडचणी वाढल्या

Nagpur हेल्मेटमध्ये विषारी नाग बसला होता! महिला घालणार होती, पण फुत्कार ऐकून धक्का बसला

Pune शिवसेनेने १०० हून अधिक उमेदवार उभे केले, भाजपसाठी अडचणी वाढल्या

पुढील लेख
Show comments