Dharma Sangrah

Dahi Handi 2023: राज्य सरकार कडून राज्यातील गोविंदांना विमासंरक्षणची मदत

Webdunia
सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (13:41 IST)
राज्यात दही हंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गोविंदा उंच मनोरे रचून दहीहंडी फोडतात. दरवर्षी रचलेल्या उंच मनोऱ्यातून  पडून बरच गोविंदा जखमी होतात किंवा त्यांचा दुर्देवी मृत्यू होतो. यंदा राज्यातील दही हंडी उत्सव आणि प्रो -गोविंदा लीग सारख्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 50 हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी राज्य सरकार ने मान्य केली आहे. 

राज्यातील गोविंदा पथकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विमा संरक्षणाची मागणी केली  असून उप मुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी मागणी स्वीकार केली असून गोविंदांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. विमा संरक्षणाचा लाभ राज्यातील 50 हजार गोविंदांना होणार असून त्यासाठी लागणारा प्रत्येकी 75 रुपयांप्रमाणे 37 लाख 50 हजार रुपयांचा विमा हप्ता महाराष्ट्र राज्य दहिहंडी समन्वय समितीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. समितीला तशी परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, गोविंदा पथकाकडून करण्यात आलेली विमा संरक्षणाची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. याबाबत गोविंदा पथकाने सरकारचे आभार मानले आहे. 
 
मुंबई ठाण्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरीच्या निवासस्थानी 11 जुलै 2023 रोजी जाऊन गोविंदांच्या विमा संरक्षणाची मागणी केली असून सव्वामहिन्यांच्या आत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  गोविंदांची मागणी मान्य केली आहे. गोविंदा पथकांना विमा संरक्षण देण्याच्या शासनाचा निर्णय क्रीडा विभागातर्फे जारी करण्यात आला आहे. 
 
 Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

अण्णा हजारेंचा संघर्ष यशस्वी, राज्यात नवीन लोकायुक्त कायदा लागू होणार

LIVE: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती

U19 Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल जाणून घ्या

बारामती न्यायालयाने अजित पवारांना मोठा दिलासा दिला, निवडणुकीशी संबंधित प्रक्रिया आदेश रद्द केला

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा भंग करण्याचा प्रयत्न, कामगाराला अटक

पुढील लेख
Show comments