Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दानवेंना प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी अशा प्रकारचे स्टेटमेंट करावे लागतात

Webdunia
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (10:18 IST)
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्यानंतर काँग्रेसने देखील दानवेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दानवेंना प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी अशा प्रकारचे स्टेटमेंट करावे लागतात, अशी टीका केली  आहे. 
 
“रावसाहेब दानवेंना प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी अश्या प्रकारची वक्तव्य करावी लागतात. या देशासाठी काँग्रेस पक्षाचा तसंच काँग्रेस नेतृत्वाचा त्याग आहे. जवाहरलाल नेहरु 13 वर्ष जेलमध्ये राहिले, इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधींची हत्या झाली. काँग्रेसचा इतका त्याग असताना भाजपचा देशासाठी काय त्याग आहे?”, असा सवाल करत भाजप काँग्रेसशी बरोबरी देखील करु शकत नाही, असं माणिकराव ठाकरे म्हणाले.
 
“भाजपची भूमिका नेहमीच द्वेषाची राहिलेली आहे. देशातल्या विविध जातिधर्मांच्या लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याची यांची भूमिका राहिलेली आहे. लोकांची आपसात तंटे कसे लागतील आणि त्याचा राजकीयदृष्ट्या आपल्याला फायदा कसा होईल, हाच डाव भाजप खेळत आलं आहे, अशी टीका माणिकराव ठाकरे यांनी केली. दानवेंच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देण्याची गरज वाटत नाही, असं ठाकरे म्हणाले.

संबंधित माहिती

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

पुढील लेख
Show comments