Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव ठाकरे एनडीए मध्ये येण्याचा दीपक केसरकरांचा दावा

Webdunia
सोमवार, 3 जून 2024 (09:54 IST)
उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून त्यापूर्वी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी येत आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला सोडून एनडीए मध्ये परत येण्याचा चर्चा सुरु झाल्या असून ते पंतप्रधान मोदींच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी केला आहे.  

उद्धव ठाकरे हे मोदींच्या संपर्कात असून विविध लोकांच्या मध्यातून ते मोदींना मेसेज पाठवत आहे 
उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत असून आता ते एनडीए मध्ये शामिल होण्याचा प्रयत्नात आहे. 
 
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल मध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्व खाली पुन्हा एनडीए सरकार स्थापित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून एक्झिट पोलनुसार महायुतीला महाराष्ट्रात उद्धव गटाची शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची युती असलेल्या  महाविकास आघाडीकडून कडवी लढत होईल.आता मंत्री केसरकर यांच्या दाव्याने माविआमध्ये सहभागी असलेल्यांना धक्का बसला आहे.
 
केसरकर म्हणाले, जागावाटप होणारा विलंबामुळे राज्यात आम्हाला नुकसान झाले आहे. विधानसभेत या कडे अधिक लक्ष देण्याचे ते म्हणाले. आता एनडीए मध्ये उद्धव येण्यासाठी पंतप्रधान मोदींना संदेश पाठवत असल्याचे ते म्हणाले 
 
तसेच रवी राणा यांनी देखील येत्या 15 दिवसांत उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडून एनडीए मध्ये येऊन पक्ष बदलतील असे म्हटले आहे. 

राणा म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात खूप काही बोलले असले तरी पंधरा दिवसांत ठाकरे पक्ष बदलतील. पण मी पूर्ण विश्वासाने सांगतो की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यावर येत्या 15 दिवसांत उद्धव मोदी सरकारमध्ये असतील. 
 
 
Edited by - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

INDW vs SAW: भारतीय महिला संघाला T20 मालिकेत टिकून राहण्याची शेवटची संधी

Zorawar Tank : भारतातील सर्वात हलकी टॅंक जोरावरची झलक समोर आली

Rath Yatra 2024: आजपासून जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात,भगवान जगन्नाथ गुंडीचा मातेच्या मंदिरात प्रवेश करतील

अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी झालेल्या गोळीबारात 33 ठार, शिकागोत 11 जणांचा मृत्यू

सुरत शहरात सहा मजली इमारत कोसळली; मृतांची संख्या सातवर, बचाव कार्य सुरु

सर्व पहा

नवीन

कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, 4 दहशतवादी ठार

36 वर्षांच्या महिलेला अजगराने गिळलं

मी नाही साडी नेसत जा!', नैतिकता, संस्कृतीचे निकष महिलांच्या कपड्यापाशीच येऊन का थांबतात?

Hathras Stampede:हातरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुरतमध्ये भीषण अपघात, सहा मजली इमारत कोसळली,15 जण जखमी

पुढील लेख
Show comments